महाआयटीकडून प्रणाली तयार झाल्यानंतर रिक्षाचालकांना अनुदानाचा लाभ मिळणार
टाळेबंदी आणि त्या अनुषंगाने येणाऱ्या निर्बंधांमुळे होणाऱ्या नुकसानाची धग कमी करण्यासाठी राज्यातील रिक्षाचालकांना १,५०० रुपये सानुग्रह अनुदान देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला. मात्र, बँक खात्यावर थेट अनुदान जमा करण्यासाठी महाआयटीकडून (महाराष्ट्र इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी) प्रणाली तयार केली जाणार असून त्यासाठी साधारण एक महिन्यापेक्षा जास्त कालावधी लागणार आहे. त्यानंतर रिक्षाचालकांना अनुदानाचा लाभ मिळणार आहे.
राज्यात ७ लाख १५ हजार रिक्षा परवानाधारकांना प्रत्येकी १५०० रुपये प्रमाणे एकूण १०७ कोटी रुपये सानुग्रह अनुदान देण्याचा निर्णय झाला आहे
www.konkantoday.com