तिसऱ्या लाटेच्यावेळी प्राणवायू नाही ,अशी सबब कोणालाही सांगता येणार नाही-मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
राज्यात करोनाची तिसरी लाट जुलै-ऑगस्ट महिन्यात येणार असल्याचा अंदाज तज्ज्ञांनी वर्तवला आहे. त्यापूर्वी आपण प्राणवायूच्या बाबतीत स्वंयपूर्ण झाले पाहिजे. प्रत्येक तालुक्यात प्राणवायूचा प्रकल्प तयार पाहिजे. प्राणवायूसाठी आज जी धावपळ सुरु आहे, ती तेव्हा होता कामा नाही. तिसऱ्या लाटेच्यावेळी प्राणवायू नाही ,अशी सबब कोणालाही सांगता येणार नाही, याची सर्वांना दक्षता घ्यावी ,असे आदेश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गुरूवारी राज्यातील विभागीय आयुुक्त आणि जिल्हाधिकाऱ्यांना दिले.
www.konkantoday.com