मंडणगड तालुक्यातील विन्हे गुरववाडी येथे एका घरावर धाड, १ लाख १५ हजाराचा गांजा जप्त
मंडणगड तालुक्यातील विन्हे गुरववाडी येथे एका घरावर धाड टाकून स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने १ लाख १५ हजार ५६० रुपये किमतीचा ५किलो ७७८ ग्रॅम वजनाचा गांजा जप्त केला़. या कारवाईत पोलिसांना गावठी, देशी आणि विदेशी दारूचा साठाही सापडला़ आहे. पोलिसांनी दोघांवर गुन्हा दाखल केला आहे़.
www.konkantoday.com