
अधिकाधिक लशींच्या कुप्या उपलब्ध होण्यासाठी जागतिक निविदा काढण्याचा राज्याचा निर्णय
१८ ते ४४ वयोगटाला येत्या १ मेपासून लस दिली जाणार आहे. त्यामुळे लसीकरण केंद्रांवर मोठ्या प्रमाणात गर्दी होण्याची शक्यता असून याबाबत राज्यांनीच जबाबदारी घ्यावी, अशी सूचना केंद्राने के ली आहे. त्यामुळे अधिकाधिक लशींच्या कुप्या उपलब्ध होण्यासाठी जागतिक निविदा काढण्याचा निर्णय राज्याने शनिवारी घेतला.
याबाबतची माहिती राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली असून अशा प्रकारे लशीची जागतिक निविदा काढणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य ठरले आहे.
www.konkantoday.com