
रुग्ण आणि शासकीय यंत्रणा यांच्यातील दुवा ठरलेले हेल्पिंग हॅंडसचे सामाजिक कार्यकर्ते कोरोना युद्धात उतरले
काेरोना काळात विविध पातळ्यांवर काम करण्यासाठी शहरातील सुमारे २८ सामाजिक संस्थांच्या एकत्रीकरणातून स्थापन झालेल्या ‘हेल्पिंग हॅंडस्’ फोरमचे कार्यकर्ते सध्या पहिल्या फळीत विविध ठिकाणी काम करत आरोग्य यंत्रणेसह जिल्हा प्रशासन यांच्या मदतीला धावून आले आहेत. कोरोना रुग्ण, त्यांचे नातेवाईक यांच्याकरिताही साहाय्यभूत ठरत असून, यंत्रणा आणि रुग्ण यांच्यातील महत्त्वाचा दुवा ठरत आहेत.परिस्थितीत रुग्ण आणि शासकीय यंत्रणा यांच्यातील दुवा बनण्याचे काम हेल्पिंग हॅंडसचे सुमारे १०० सामाजिक कार्यकर्ते गेल्या काही दिवसांपासून करीत आहेत. जिल्हा रुग्णालय, महिला रुग्णालय येथील रुग्णांमध्ये मनोबल वाढविण्याबरोबरच त्यांच्या गैरसोयी दूर करण्यासाठी झटत आहेत. जिल्हा रुग्णालय तसेच महिला रुग्णालयात सध्या रुग्णसंख्या वाढली आहे. अशावेळी भीतीच्या छायेखाली असलेले रूग्ण आणि त्यांचे नातेवाईक यांना महत्त्वाची मदत हे कार्यकर्ते करीत आहेत
www.konkantoday.com