आरोग्य विभागात तात्पुरत्या भर्तीचा फार्स करून दिशाभूल थांबवा;- दीपक पटवर्धन
रत्नागिरीच्या आरोग्य व्यवस्थेला मनुष्यबळ नाही रुग्ण संख्या वाढती आहे.मात्र वैद्यकीय अधिकारी परिचारिका वॉर्ड बॉय आणि अन्य कर्मचारी यांची वानवा सातत्याने असल्याने यंत्रणे वर बोजा अतिरिक्त आहे अश्या स्थितीत जिल्हा आरोग्य व्यवस्थाच हतबल होईल अशी स्थिती आहे.
आरोग्य व्यवस्थे बाबत सत्ताधीश बेफिकीर
जिल्हयातील नागरिकांच्या जीवाशी खेळ होत असताना लोकप्रतिनिधी, महाआघाडी शासन बेफिकीरीत आहेत. भाजपा वर राजकारण करण्याचा आरोप केला की सगळं अपयश माफ अस समजून सत्ताधीश मश्गुल आहेत.
तात्पुरत्या भरती चा खेळ थांबवा
गेले अनेक महिने आरोग्य वावस्थेत खूप जागा रिक्त आहेत अगदी गळ्याशी आलं की तात्पुरती भरती करण्याची घोषणा करणे हा खेळ झाला आहे. कोरोनकसारख्या महामारीत धोका पत्करून 2 आणि 3 महिन्या साठी कोणतीही भविष्याची हमी, सुरक्षितता नसताना, धोका पत्करून आरोग्य यंत्रणेत अल्प मोबादल्यावर काम करायला लावणे म्हणजे गरजू बेरोजगारांची चेष्टा आहे .परत जाहिरात देऊन भरती जहीर करून माणस मिळत नाही म्हणायला यंत्रणा तयार असते आज ही परत “तात्पुरती भरती” असे फसवे वृत्त प्रसिद्ध झाले आहे. हा खेळ थांबवून रीतसर भरती केली जावी अशी मागणी भारतीय जनता पार्टी करत आहे.
भविष्यातील भारतीय प्राधान्य, आणि मोफत उपचार देणे आवश्यक
तात्पुरती भरती हा बेरोजगार युवकांना धोक्यात टाकण्या चा खेळ आहे. कोरोना च्या या अवघड कालावधीत रुजू होणाऱ्या व्यक्तींना भविष्यात भरती वेळी प्राधान्य देण्याचे आणि त्यांना गरज लागली तर मोफत उपचार देण्याची हमी घोषित करावी . एका बाजूला नागरिकांचे आरोग्य आणि दुसऱ्या बाजूला तात्पुरत्या रोजगाराच फसवं मायाजाल दाखवून चाललेली फसवणूक तात्काळ थांबवावी व रिक्त जागा भरण्या च्या खऱ्या मानसिकतेने भरती अभियान राबवले तरच हा अनुशेष भरून आरोग्य व्यवस्थेचा भार हलका होईल अशी परखड मागणी दीपक पटवर्धन यांनी केली आहे.
www.konkantoday.com