सिंधुदुर्ग जिह्यात कुडाळ ,कणकवली व सावंतवाडी येथे ऑक्सिजन प्लांट उभारणार ना.उदय सामंत यांची घोषणा

0
46

कोकणातही कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात होत आहे. सिंधुदुर्ग जि्ह्यात कोरोनाबाधितांचा आकडा वाढत असताना मृत्यूचीही संख्या वाढत आहे. त्यामुळे चिंता व्यक्त करण्यात येत आहे. आता ऑक्सिजनचा पुरवठा कमी पडू लागला आहे. दरम्यान, पालकमंत्री उदय सामंत यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यात ऑक्सिजन प्लांट उभारणार असल्याची घोषणा केली आहे. त्यासाठी निधी उपलब्ध करुन देणार असल्याची माहिती त्यांनी दिली.
कुडाळ येथील महिला रुग्णालय येथे 1 हजार लिटर , कणकवली येथे 500 लिटर आणि सावंतवाडी येथे 500 लिटरक्षमतेचे ऑक्सिजन प्लांट उभारण्यात येणार आहेत.
www.konkantoday.com

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here