सिंधुदुर्गात खाजगी कोविड हॉस्पिटलच्या बिलांवर नियंत्रण ठेवण्यासाठी समिती स्थापन

0
51

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वाढत्या कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्ह्यातील खाजगी रुग्णालय ही पेड कोविड हॉस्पिटल म्हणून चालवण्यास जिल्हा शल्य चिकित्सक यांनी परवानगी दिलेली आहे. सदर रुग्णालयांमध्ये उपचार घेत असलेल्या रुग्णांसाठी सार्वजनिक आरोग्य विभागाने दिलेल्या दरांपेक्षा जास्त दर आकारता येणार नाहीत असे आदेश शासनाने दिलेले आहेत. त्याअनुषंगाने जिल्ह्यातील रुग्णालयांकडून कोविड – 19 बाधीत रुग्णांकडून उपचारापोटी आकारण्यात येणाऱ्या बीलांची तपासणी व महात्मा फुले जन आरोग्य योजनेंतर्गत करण्यात येणारे उपचार व योजनेचा लाभ इत्यादी बाबतची तपासणी करण्यासाठी जिल्हास्तरीय समिती व तालुका स्तरावर समन्वय अधिकारी यांची नेमणूक करण्यात आले आहे.
www.konkantoday.com

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here