महिला कोव्हिड रुग्णालयात स्वामी स्वरूपानंद पतसंस्थेची रुग्णांच्या नातेवाईकांसाठी भोजन व्यवस्था ॲड. दीपक पटवर्धन

0
38

रत्नागिरी मधील महिला रुग्णालयात रुग्णांच्या नातेवाइकांना दुपारच्या जेवणासाठी जवळ व्यवस्था नसल्याने त्रासदायक होत होते. ही गोष्ट निदर्शनास आल्यानंतर स्वामी स्वरूपानंद पतसंस्थेचे अध्यक्ष ॲड. दीपक पटवर्धन यांनी मा.जिल्हाधिकारी व मा. जिल्हा सिव्हिलसर्जन यांना संपर्क करून स्वामी स्वरूपानंद पतसंस्थेमार्फत भोजन व्यवस्था करण्याची इच्छा प्रकट केली व मान्यता मिळताच आज दुपारच्या जेवणाची व्यवस्था करण्यात आली. स्वरूपानंद पतसंस्थेमार्फत सामाजिक बांधिलकी जपत हा मोफत भोजनाचा उपक्रम राबवण्यात आला. रुग्णांच्या नातेवाइकांनी या सुविधेचा लाभ घ्यावा असे आवाहन ॲड. दीपक पटवर्धन यांनी केले आहे. कोव्हीड महामारीच्या या कठीण कालखंडात सहकार क्षेत्राने मोठे योगदान देणे अपेक्षित आहे. रत्नागिरीचे सहकार क्षेत्र या आव्हानात्मक परिस्थितीत मागे राहणार नाही असा विश्वास ॲड. पटवर्धन यांनी व्यक्त केला.
www.konkantoday.com

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here