मुंबई गोवा महामार्गावरील पीरलोटे येथे बर्निंग ट्रकचा थरार

0
46

खेड : मुंबई गोवा महामार्गावरील पीरलोटे येथे आज दुपारी १२:१५ वाजता एका कोळसा वाहून न्हेणाऱ्या ट्रकला अचानक आग लागली त्यामुळे महामार्गावर बर्निंग ट्रकचा थरार पाहावयास मिळाला. वेळीच खबरदारी घेतली गेल्याने काही वेळातच भडकलेली आग आटोक्यात आली आणि अनर्थ टळला.
आज दुपारी १२:१५ वाजता पीरलोटे येथील हॉटेल पार्वती नजीक एका चालत्या कोळसा वाहू ट्रकच्या केबिन मधून अचानक धूरं येऊ लागला. चालकाच्या हे लक्षात येताच त्याने ट्रक थांबवून ट्रक मधून उडी मारली. काही कळायच्या आत ट्रकच्या केबिन ला आग लागली आणि महामार्गावर काहीवेळ हल्लकल्लोळ निर्माण झाला.
खेड येथील मदत ग्रुप चे सहकारी व अन्य नागरीक यांनी वेळीच खबरदारी घेऊन आग वीजवळी आणि अनर्थ टळला .
या दुर्घटनेत ट्रकचे नुकसान झाले आहे. आगीचे कारण अद्याप कळू शकले नाही.
www.konkantoday.com

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here