सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड येथे काेराेनाची लस घेण्यासाठी चाललेल्या दांम्पत्याचा अपघातात मृत्यू
काेराेनाची लस घेण्यासाठी जात असताना दाम्पत्याचा अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगडमध्ये ही घटना घडली आहे. संजय जोशी आणि सायली जोशी असं या मृत द़ांम्पत्याचं नाव आहे. देवगडमध्ये कोरोनाची लस घेण्यासाठी जात असताना दुचाकी व टेम्पो यांच्यात भीषण अपघात झाला, यात जोशी दाम्पत्याचा जागीच मृत्यू झाला देवगडमधील नाडण येथील जोशी दाम्पत्य दुचाकीने रेडी रेडव या सागरी महामार्गाने नाडणवरून देवगडला कोरोनाची लस घेण्यासाठी जात असताना हा अपघात झाला.
www.konkantoday.com