
रत्नागिरीतच कडक कर्फ्यू कशासाठी,महाराष्ट्र शासनाने नियमावली ठरवून दिलेली दुकाने उघडी राहिली पाहिजेत – माजी खासदार नीलेश राणे
कोराेनाचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी महाराष्ट्र शासनाने नियमावली ठरवून दिली असताना रत्नागिरीत प्रशासनाकडून कडक कर्फ्यू लावण्याचे कारण काय असा सवाल माजी खासदार नीलेश राणे यांनी उपस्थित केला आहे रत्नागिरी प्रशासनाला माझे सांगणे आहे की ज्या महाराष्ट्र शासनाने व ज्या गोष्टी चालू ठेवण्यास परवानगी दिली आहे त्या गोष्टी रत्नागिरीत सुरू राहिल्या पाहिजेत आरोग्यसेवा देण्यास तुम्ही कमी पडतातपण त्यासाठी आता लोकांवर बंधने घालून त्यांचा अंत बघू नका असा इशाराही राणे यांनी दिला आहे
www.konkantoday.com