तापमानाचा चढलेला पारा आणि वाढलेल्या उकाडय़ामुळे विजेच्या मागणीत मोठी वाढ

0
50

तापमानाचा चढलेला पारा आणि वाढलेल्या उकाडय़ामुळे विजेच्या मागणीत मोठी वाढ झाली असून त्याचे चटके महावितरणला बसत आहेत. सध्या महावितरणकडे दररोज जवळपास २२ हजार मेगावॅटहून अधिक विजेची मागणी नोंदली जात आहे. सदर मागणी पूर्ण करण्यासाठी महानिर्मितीकडून सुमारे आठ हजार तर खासगी वीज कंपन्यांकडून सात-आठ हजार मेगावॅट वीज उपलब्ध होत आहे. त्यामुळे महावितरणला आयत्या वेळी केंद्रीय पॉवर एक्स्चेंजमधून दररोज जवळपास सहा हजार मेगावॅटहून अधिक वीज जादा दराने घ्यावी लागत आहे. त्यामुळे आधीच आर्थिक अडचणीत असलेल्या महावितरणच्या डोक्यावरचा भार वाढत आहे.
www.konkantoday.com

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here