रत्नागिरी जिह्यात अतिशय कडक लॉक डाऊनची अंमलबजावणी -जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा
शासनाच्या आदेशाप्रमाणे रत्नागिरी जिल्ह्यात अतिशय कडक लॉक डाऊनची ची अंमलबजावणी केली जाणार असल्याचे जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी आज पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केले यावेळी दिवसादेखील १४४ कलम लागू करण्यात आली आहे त्यामुळे अत्यावश्यक सेवा वगळता इतर कोणीही घराबाहेर पडू नये नाका नाक्यावर पोलिसांचे चेकपोस्ट उभारण्यात येणार असून पोलिसांनी कडक कारवाईच्या सूचना देण्यात आल्या आहेत विनाकारण फिरणाऱ्यांवर दंडाची कारवाई होणार आहे याशिवाय बाहेर पडलेल्या इसमाची करोना टेस्टही केली जाणार आहे याशिवाय जे वाहन वापरणार आहे त्याच्यावर आरटीओमार्फत ही कारवाई केली जाणार आहे असेही मिश्रा यांनी सांगितले यासाठी नागरिकांनी जिल्हा प्रशासनाला सहकार्य करावे व कोरोना रोखण्यासाठी विनाकारण घराबाहेर पडू नये असेही आवाहन त्यांनी केले
www.konkantoday.com