दापोली मंडणगड तालुक्यातील सुपारीचे सुमारे १०० हेक्टर क्षेत्र निसर्ग चक्रीवादळाच्या फटक्यामुळेे पूर्णत: उद्ध्वस्त
दापोली मंडणगड तालुक्यातील सुपारीचे सुमारे १०० हेक्टर क्षेत्र निसर्ग चक्रीवादळाच्या फटक्यामुळेे पूर्णत: उद्ध्वस्त झाले आहे. बाजारात पाठवण्यासाठी येथील कोणाकडेही सुपारी शिल्लक नसल्याने बागायतदारांचे खूप मोठे नुकसान झाले आहे, अशी माहिती सुपारी खरेदी संघाचे अध्यक्ष व कृषी बाजार समिती रत्नागिरीचे संचालक मधुकर दळवी यांनी दिली.
निसर्ग चक्रीवादळाचा दापोली, मंडणगड या दोन तालुक्यांना मोठा फटका बसला हाेता. नारळ, सुपारीच्या बागांचे मोठे नुकसान झाले हाेते
www.konkantoday.com