
खेडमधील रिक्षा व्यावसायिकांचे प्रशासनाला साकडे
खेड : कोरोनाच्या संकटापासून रिक्षा व्यावसायिक आर्थिक कोंडीत अडकला आहे. मिनी लॉकडाऊनच्या निर्बंधामुळे रिक्षा व्यवसाय बंद ठेवावा लागल्यास कुटुंबावर उपासमारीची पाळी येणार आहे. या पार्श्वभूमीवर निर्बंधांचे पालन करून व्यवसाय सुरू करण्यास परवानगी द्या, अशा मागणीचे निवेदन महाराष्ट्र नवनिर्माण रिक्षा सेनेचे जिल्हाध्यक्ष सिकंदर बांगी यांनी प्रांताधिकारी अविशकुमार सोनोने यांना दिले आहे.
www.konkantoday.com