रत्नागिरी जिल्ह्यात चिपळूण व राजापूरात पावसाच्या सरी
चिपळूण तालुक्यातील शिरगाव व सह्याद्री खोऱ्यातील परिसरात रविवारी सायंकाळी मेघ गर्जनेसह धुवाधार पाऊस कोसळला. या पावसामुळे शेतकरी, व्यापारी आणि ग्रामस्थांची एकच तारांबळ उडाली. या अवकाळी पावसाचा फटका आंबा पिकाला बसला आहे.
गेले काही दिवस जिल्ह्याचे तापमान वाढले असताना राजापूर तालुक्यात रविवारी रात्री दहा वाजण्याच्या सुमारास ढगांच्या गडगाडाटासह मुसळधार पर्जन्यवृष्टी सुरु झाली.
मात्र हा पाऊस बराच काळ रेंगाळू नये अशी अपेक्षा आंबा बागायतदार व्यक्त करत आहेत.
www.konkantoday.com