मुंबईतून आता रो पॅक्स फेरी सेवेचे चार नवे जलमार्ग तसेच वॉटर टॅक्सीचे १२ नवे जलमार्ग डिसेंबरपर्यंत सुरू करण्यात येणार

मुंबईकरांची रस्ते मार्गावरील वाहतूककोंडीतून सुटका करून त्यांना आता जलमार्ग वाहतुकीचा पर्यावरणस्नेही पर्याय देण्यात येणार आहे. मुंबईतून आता रो पॅक्स फेरी सेवेचे चार नवे जलमार्ग तसेच वॉटर टॅक्सीचे १२ नवे जलमार्ग डिसेंबरपर्यंत सुरू करण्यात येणार आहेत.
सध्या भाऊचा धक्का ते मांडवा (अलिबाग) अशा रोपॅक्स सेवेमुळे रस्ते मार्गाने होणारा ११०किलोमीटरचा प्रवास जलमार्गाने १८ किलोमीटर एवढा कमी झाला आहे. त्यामुळे प्रवाशांचा रोजचा तीन ते चार तासांचा प्रवासाचा वेळ एक तासापर्यंत कमी झाला आहे. या फेरी सेवेत प्रवाशांना आपली वाहने घेऊन बोटीतून प्रवास करता येत असल्याने मुंबईतील विविध जलमार्गांवर अशाच प्रकारची सेवा सुरू करण्याची योजना आहे.डॉमेस्टीक क्रुझ टर्मिनल ते नेरूळ, बेलापूर, वाशी, ऐरोली, रेवस (रेडी), करंजा (रेडी), धरमतर (रेडी), कान्होजी आंग्रे आयलॅण्ड तसेच बेलापूर ते ठाणे, बेलापूर ते गेट वे ऑफ इंडिया, वाशी ते ठाणे, वाशी ते गेट वे ऑफ इंडिया अशा १२ मार्गांवर वॉटर टॅक्सी सेवा सुरू करण्यात येणार आहे.
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button