दापोली शहरातील गटाराचे पाणी विहिरीत उतरत असल्याने पाच ते सहा घराच्या विहिरीचे पाणी दूषित,मनसेचा आंदोलनाचा इशारा
दापोली शहरातील गटाराचे पाणी विहिरीत उतरत असल्याने पाच ते सहा घराच्या विहिरीचे पाणी दूषित झाले आहे. त्यामुळे १२ ते १५ कुटुंबीयांचा पिण्याचा पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. या कुटुंबीयांचा पाणी प्रश्न सोडवण्यासाठी गटारातील गाळ काढून गटार खोलीकरण करावे या मागणीसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेना आक्रमक झाली असून, साेमवारपर्यंत पाण्याचा निचरा न केल्यास आंदाेलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे.
मनेसचे जिल्हा उपाध्यक्ष सचिन गायकवाड, तालुकाध्यक्ष नितीन साठी, शहराध्यक्ष साईराज देसाई यांनी आक्रमक भूमिक मांडली आहे
www.konkantoday.com