सर्वसामान्य माणसापासून उद्योगधंद्यांपर्यंत सर्वांनाच लॉकडाउनमुळे मोठा फटका,मात्र सरकार राज्यातील टोल कंत्राटदारांना नुकसानभरपाई देणार

0
21

लॉकडानच्या काळात आणि त्यानंतरही धंदा बुडाल्यामुळे नुकसान झालेल्या राज्यातील टोल कंत्राटदारांना नुकसानभरपाई देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. याशिवाय मुंबई-पुणे द्रुतगती मार्ग तसेच जुना मुंबई-पुणे रस्त्याचे टोल कंत्राटाची मुदत ९६ दिवसांनी तर मुंबई एन्ट्री पॉइंट टोल कंत्राटाची मुदत १९७ दिवसांनी वाढवून देण्याचा निर्णय घेतला आहे.केंद्र सरकार आणि अर्थ मंत्रालयाने देशभरातील टोल कंत्राटदारांना नुकसानभरपाई देण्याचे धोरण ठरवले. ज्यामध्ये टोलबंदीच्या काळातील संपूर्ण तसेच लॉकडाउननंतर रहदारी ९० टक्के पातळीवर येईपर्यंतच्या काळातील नुकसानीच्या प्रमाणात टोल कंत्राटदारांना नुकसानभरपाई देण्याचे निकष या धोरणात ठरवले आहे.करदात्यांचे काही हजार कोटी रुपये टोल कंत्राटदारांना नुकसानभरपाई म्हणून दिले जाणार आहेत. सर्वसामान्य माणसापासून उद्योगधंद्यांपर्यंत सर्वांनाच लॉकडाउनमुळे मोठा फटका बसला आहे, त्यांनी तो सहन केला असताना अशा प्रकारे एकाच घटकाला नुकसान भरपाई देणे म्हणजे उर्वरित सर्वांच्या जखमेवर मीठ चोळण्याचा प्रकार आहे. सजग नागरिक मंचचे विवेक वेलणकर याने म्हटले आहे
www.konkantoday.com

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here