लससाठ्याच्या मुद्द्यावरून राज्य आणि केंद्र सरकार आमनेसामने

0
20

राज्यात लसीकरण देशात सर्वाधिक झालेले असून आता लससाठ्यावरून वाद निर्माण होण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. लससाठ्याच्या मुद्द्यावरून राज्य आणि केंद्र सरकार आमनेसामने आल्याचे चित्र बुधवारी पाहायला मिळाले. राज्यात पुरेसा लससाठाच उपलब्ध नाही, असे सांगत राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केंद्राकडे बोट दाखवले. तर राज्य सरकार आपले अपयश झाकण्यासाठी लोकांमध्ये लससाठ्यावरून घबराट निर्माण करीत असून, लसीचा कुठेही तुटवडा नसल्याचे केंद्रीय आरोग्यमंत्री हर्ष वर्धन यांनी म्हटले आहे.
www.konkantoday.com

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here