सर्व व्यापारी आस्थापना बंद ठेवण्याचा निर्णय घेत असाल तर तुम्हाला व्यापाऱ्यांकडून कोणताही प्रतिसाद मिळणार नाही -कोल्हापुरातील व्यापाऱ्यांचा निर्णय
तुम्ही सर्व व्यापारी आस्थापना सुरू असताना कारवाई केली तर आम्ही अत्यावश्यक व जीवनावश्यक सेवासुध्दा बंद ठेवू, असा इशारा सर्व सलंग्न संघटनांतर्फे अध्यक्ष संजय शेटे यांनी प्रशासनाला दिला. यावर पालकमंत्री सतेज पाटील व मंत्री राजेंद्र पाटील – यड्रावकर यांनी कोल्हापूर चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीज आणि सर्व सलंग्न संघटना यांच्याकडून मुदत मागून आज (६) राेजी योग्य तो निर्णय देऊ असे आश्वासन दिले आहे.
‘ब्रेक द चेन’ अंतर्गत अत्यावश्यक व जीवनावश्यक सेवा सोडून उर्वरीत सर्व व्यापारी आस्थापनांना बंदी लागू आहे.
यावेळी सलंग्न संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी परिपत्रकामधील सर्व व्यापारी आस्थापना (अत्यावश्यक व जीवनावश्यक सेवा सोडून) बंद ठेवा या निर्णयाचा कडाडून विरोध केला. सर्व व्यापारी आस्थापना बंद ठेवण्याचा निर्णय घेत असाल तर तुम्हाला व्यापाऱ्यांकडून कोणताही प्रतिसाद मिळणार नाही. कारण जिल्ह्यातील व्यापारी आस्थापना या ‘माझे कुटूंब-माझी जबाबदारी’ या योजनेअतंर्गत शासनाने घालून दिलेले कोरोना प्रतिबंधाचे सर्व नियम पाळत आहे
www.konkantoday.com