
दुकाने बंद ठेवण्यास रत्नागिरीतही व्यापाऱ्यांचा विरोध ,व्यापारी संघटनेचे मौन
शासनाच्या आदेशाप्रमाणे आजपासून लागू झालेल्या नव्या नियमावलीप्रमाणे अत्यावश्यक सेवा वगळून सर्व दुकाने व बाजारपेठा बंद ठेवण्याचा निर्णय झालेला आहे मात्र गेल्या वर्षभरात कोराेनाच्या परिस्थितीमुळे अडचणीत आलेल्या व्यापाऱ्यांचा या निर्णयाला विरोध सुरू झाला आहे शासनाच्या या निर्णयात अत्यावश्यक सेवेत मिठाई दुकानापासून अन्य खाद्यपदार्थां दुकानाना वगळण्यात आले आहे त्यामुळे या अर्धवट लाॅक डाऊनमुळे शासनाचा करोना रोखण्याचा हेतू कसा काय साध्य होणार असा प्रश्न व्यापाऱ्यांना पडला आहे शासनानेदेखील सध्या हा मिनी लॉक डाऊन जाहीर केला असून आवश्यक असल्यास त्यानंतर पूर्णपणे लॉक डाऊन केला जाणार असल्याचे जाहीर केले आहे यामुळे जर पुढे तशी परिस्थिती आल्यास त्यावेळी पण दुकाने बंद ठेवावी लागणार आहेत अन्य जिह्यातूनदेखील व्यापाऱ्यांचा विरोध सुरू झाला आहे गेल्या वेळी व्यापारी अडचणीत आले असतानाही शासनाने कोणतीही सवलत दिली नाही याउलट शेतकर्यांना वीजबिलापासून कर्जात देखील शासनाने माफी दिली आहे शासनाचे सर्व प्रकारे कर टॅक्स भरणाऱ्या व्यापारी यामुळे आर्थिक अडचणीत आला आहे आंतरजिल्हा वाहतुकीवर कोणतेही बंदी नाही तसेच वाहतूकही सुरू आहे मात्र दुकाने बंद ठेवून करोना कसा काय रोखला जाणार असा प्रश्न व्यापाऱ्यांना पडला आहे यामुळे व्यापाऱ्यांनी या निर्णयाला विरोध केला आहे रत्नागिरी जिल्हा फोटोग्राफर असोसिएशननेही या निर्णयाला विरोध दर्शविला आहे रत्नागिरीतील एका व्यापारी संघटनेने याला विरोध केला आहे तर जुनी व्यापारी संघटनेचे पदाधिकारी जिल्हाधिकारी कार्यालयात येऊन गेले मात्र आपली भूमिका शासनापर्यंत न पोहोचवता ते निघून गेले इतर सर्व जिल्ह्यांत व्यापारी संघटनांनी या निर्णयाला विरोध केला असताना रत्नागिरी व्यापारी संघटनेने मात्र याबाबत मौन पाळले आहे नामदार उदय सामंत आज रत्नागिरीत येत असून ते याबाबत कोणता निर्णय घेणार याकडे लक्ष लागले आहे
www.konkantoday.com