१८ ते ३५ या वयातील तरुण पिढीचे कोरोना लसीकरण करा- गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड यांची मागणी
राज्यात कोरोनाबाधितांच्या संख्येत सातत्याने वाढत होत आहे. या पार्श्वभूमीवर तरुणांच्या कोरोना लसीकरणाची ताबडतोब व्यवस्था करा, अशी मागणी गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंकडे केली आहे. भारत हा तरुणांचा देश ओळखला जातो. त्यामुळे १८ ते ३५ या वयातील तरुण पिढीचे कोरोना लसीकरण करा, असे ट्वीट जितेंद्र आव्हाड यांनी केले आहे. या मागणीला मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे.
www.konkantoday.com