बी. एड. कॉलेजचे होस्टेल, सामाजिक न्याय भवन, तसेच आवश्यक वाटल्यास शाळा काेव्हिड सेंटरसाठी ताब्यात घेण्याचा जिल्हा प्रशासनाचा निर्णय
रत्नागिरी जिल्हा प्रशासनाने गेल्या वर्षी घेतलेली कोविड सेंटरही ताब्यात घेण्याची प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे. बी. एड. कॉलेजचे होस्टेल, सामाजिक न्याय भवन, तसेच आवश्यक वाटल्यास शाळा ही ताब्यात घेतल्या जाणार असल्याचे जिल्हा प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे. वाढता संभाव्य धोका लक्षात घेऊन जिल्हा प्रशासनाने तयारी सुरू केली आहे.
तसेच खासगी डॉक्टरांनी सर्दी, ताप याचे रुग्ण आले तर त्याची नोंद करुन शासकीय रुग्णालयात पाठवण्याच्या सूचनाही संबंधिताना करण्यात आल्या आहेत.
www.konkantoday.com