कोरोना रुग्णाची वाढती संख्या लक्षात घेऊन जिल्हा प्रशासनाने तयारी सुरु केली
आता शहरासह ग्रामीण भागामध्ये कोरोनाची रुग्णसंख्या वाढत आहे. रत्नागिरी जिल्ह्यातही कोरोना रुग्णांचा आकडा वाढताना दिसत आहे. त्यामुळे त्या प्रमाणात उपाययोजना वाढविण्यावर भर देण्यात येत आहे. कोविड रुग्णालयातील बेडची संख्या वाढविण्यात आली आहे.
कोरोना रुग्णाची वाढती संख्या लक्षात घेऊन जिल्हा प्रशासनाने तयारी सुरु केली आहे.रत्नागिरी जिल्ह्यातील २९ कोविड केअर सेंटर ताब्यात घेण्याबाबत येत आहेत. या केअर सेंटरमध्ये कोरोनाची सौम्य लक्षणे असणारे रुग्ण ठेवले जात आहेत. त्यासाठी १६६५ बेडची स्वतंत्र व्यवस्थाही करण्यात आली आहे. राज्यात कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. कोकणात शिमगा उत्सव सुरु झाला आहे. तसेच गुढी पाडवा लक्षात घेता, खबरदारी घेण्यात येत आहे.
www.konkantoday.com