स्थानिक भूमीपुत्रांना घेऊन माचाळ पर्यटनाचा आराखडा करण्यात येईल-खासदार विनायक राऊत
लांजा तालुक्यातील माचाळ गावच्या विकासाची आता सुरुवात झाली आहे. आज परिस्थिती सुधारली असली तरी रस्त्याचे डांबरीकरण, गावात पाणी पुरवठाही सुरू करायचा आहे. माचाळ येथे अन्य पायाभूत सुविधांचा विकास करत असताना स्थानिक भूमीपुत्रांना घेऊन माचाळ पर्यटनाचा आराखडा करण्यात येईल’, असे आश्वासन खासदार विनायक राऊत यांनी दिले. विनायक राऊत यांच्या प्रयत्नाने ७० वर्षानंतर माचाळ गावात रस्ता झाला. रस्ता झाल्याने ग्रामस्थांनी खासदार विनायक राऊत यांचे गावात जंगी स्वागत करत त्यांचा सत्कार केला. यावेळी शिवसेनेचे जिल्हा सहसंपर्कप्रमुख राजेंद्र महाडिक, जिल्हाप्रमुख विलास चाळके, उद्योजक रवींद्र सामंत, किरण सामंत, उपजिल्हाप्रमुख जगदीश राजापकर, माजी जि.प.अध्यक्ष रोहन बने, विवेक सावंत, सभापती जया माने उपस्थित होते.
www.konkantoday.com