सुटीच्या दिवशीही सुरूच राहणार वीज बिल भरणा केंद्र
सध्या वीज बिल थकबाकी वसूल मोहीम सुरू आहे. याच काळात शिमगा हा कोकण वासियांचा जिव्हाळ्याचा सण देखील आहे. या पार्श्वभूमीवर गावी आलेल्या कोकण वासीयांची गैर सोय होऊ नये, तसेच ज्या वीज ग्राहकांनी हप्त्याची सवलत घेतली आहे, त्यांचा वीज पुरवठा अंतिम हप्ता न भरल्याने खंडित होऊ नये यासाठी महावितरण कंपनीने स्वतः ची सर्व बिल भरणा दिनांक 31 मार्च पर्यंत सुरू ठेवली आहेत.
सर्व वीज ग्राहकांनी आपली वीज बिल वेळेत भरणा करून वीज पुरवठा खंडित होणे टाळावे आणि अधिकृत वीज बिल भरणा केंद्रचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे.
www.konkantoday.com