मुंबईमध्ये एकूण ८६ पोलीस अधिकाऱ्यांचा तातडीने बदल्या
राज्याच आणि विशेष म्हणजे राज्याची राजधानी असणाऱ्या मुंबईमध्ये पोलीस यंत्रणांमध्ये मागील अनेक दिवसांपासून मोठ्या घडामोडी पाहायला मिळत आहेत. सध्याची अशीच एक माहिती समोर आली असून, मुंबई पोलिसांच्या क्राइम ब्रांच अर्थात गुन्हे शाखेमध्ये मोठे फेरबदल करण्यात आले आहेत. सचिन वाझे प्रकरणानंतर पोलीस आयुक्त हेमंत नगराळे यांनी हे बदल करण्याचा निर्णय घेतला होता. याच अनुषंगाने मुंबईमध्ये एकूण ८६ अधिकाऱ्यांचा बदल्या करण्यात आल्या ज्यात ६५ अधिकारी हे मुंबई क्राईम ब्रांचचे अधिकारी आहेत.
www.konkantoday.com