रत्नागिरी शहरानजीकच्या भाट्ये येथील स्मशानभूमीजवळ कुजलेल्या अवस्थेत वृद्धाचा मृतदेह सापडला
रत्नागिरीशहरानजीकच्या भाट्ये येथील स्मशानभूमीजवळ कुजलेल्या अवस्थेत मृतदेह सापडून आल्याची घटना रविवारी उघडकीस आली. सुमारे महिनाभर भाट्ये येथूनच बेपत्ता असलेल्या वृद्धाचा तो मृतदेह असल्याचे निष्पन्न झाले
प्रदिप हरमले असे त्या वृध्दाचे नाव असून दुपारी काही ग्रामस्थ या भागात गेले असता त्यांना दुर्गंधी येवू लागली. त्यांनी त्या पडक्या इमारतीत जावून पाहिले असता तेथे सडलेला मृतदेह आढळला.मृतदेहाच्या सोबत असलेल्या पिशवीत आधार कार्ड, रेशन कार्ड मिळून आल्याने प्रदिप हरमले यांची ओळख पटली.ते एक महिन्यापासून बेपत्ता होते शहर पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
www.konkantoday.com