जि.प. , सभापतींची नावे आज जाहीर हाेणार
जिल्हा परिषद अध्यक्षांसहीत विषय समिती सभापतींची नावे निश्चित करून शिवसेना नेते ती यादी जाहीर करणार आहेत
दि. २२ मार्चला जिल्हा परिषद अध्यक्ष, आरोग्य-बांधकाम, शिक्षण- अर्थ, समाजकल्याण, महिला बालकल्याण समिती सभापतींची निवड अप्पर जिल्हाधिकारी मार्गदर्शनाखाली सदस्यांच्या बैठकीत केली जाणार आहे.
टीआरपी येथील जिल्हा परिषद अध्यक्षांच्या शासकीय निवासस्थानी दि. २२ मार्चला सकाळी १० वा. सर्वपक्षीय सदस्यांची एकत्रित बैठक आयोजित करण्यात आली आहे. सदर बैठकीत शिवसेनेचे जिल्हा संपर्कप्रमुख सुधीर मोरे हे अध्यक्ष, विशय समिती सभापतींची नावे अधिकृतपणे जाहीर करतील. त्यानंतर पाचही पदाधिकारी अर्ज भरण्यासाठी शामरावजी पेजे सभागृहात दाखल होतील.
www.konkantoday.com