
राज्यमंडळाच्या दहावी बारावीच्या लेखी परीक्षेसाठी यंदा विद्यार्थ्यांना अर्धातास वेळ वाढवून देण्यात येणार
राज्यमंडळाच्या दहावी बारावीच्या लेखी परीक्षेसाठी यंदा विद्यार्थ्यांना अर्धातास वेळ वाढवून देण्यात येणार आहे. दहावीच्या प्रात्यक्षिक परीक्षाही रद्द करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे करोनामुळे परीक्षा देऊ न शकलेल्या विद्यार्थ्यांसाठी विशेष परीक्षेचे आयोजन करण्यात येणार आहे.
राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक मंडळाची दहावी आणि बारावीची परीक्षा पुढील महिन्यापासून सुरू होणार आहे. राज्यात करोना रुग्णांची संख्या वाढत असल्याने या परिक्षांबाबत संभ्रम निर्माण झाला. त्या पाश्र्वभूमीवर परीक्षा नियोजित वेळापत्रकानुसार, लेखीच होईल असे शिक्षण विभागाने स्पष्ट केले.
www.konkantoday.com