
चिपळूण तालुक्यातील कौंढर काळसूर येथील हातभट्टीवर छापा,२,२३,८०० रुपयांचा मुद्देमाल पकडला
चिपळूण तालुक्यातील कौंढर काळसूर येथील हातभट्टीवर उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन बारी यांच्यासह पथकाने छापा टाकला. या कारवाईत २,२३,८०० रुपयांचा मुद्देमाल पकडला. ही कारवाई शुक्रवारी उशिरा करण्यात आली. कारवाईदरम्यान हातभट्टीजवळ असलेली अनोळखी व्यक्ती जंगलाच्या दिशेने पळून गेली याप्रकरणी अज्ञाताविरोधात येथील पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
www.konkantoday.com