कोकणातील पहिल्या थ्रीडी तारांगणाचे सिव्हिल वर्ग ९० टक्के पूर्ण ,लवकरच तारांगण पर्यटकांसाठी खुले होण्याची शक्यता
कोकणातील प्रथमच उभ्या राहत असलेल्या थ्रीडी तारांगणाच्या कामाला आता वेग आला आहे गेल्या वर्षीपासून कोराेनाचा मुळे या तारांगणाचा कामाचा वेग थोडा मंदावला होता आता या तारांगणाचे सिव्हिल वर्ग ९० टक्के पूर्ण झाले आहे. यासाठी आवश्यक असलेल्या डोमचे काम पूर्ण झाले आहे कोकणच्या येणाऱ्या पर्यटकांच्या दृष्टीने हे तारांगण आकर्षण ठरणार आहे तांत्रिक यंत्रसामुग्रीच्या खरेदीसाठी लवकरच निविदा काढण्यात येणार आहे. त्यामुळे येत्या काही महिन्यात तारांगण कोकणवासियांसह पर्यटकांना खुले होण्याची शक्यता आहे.
रत्नागिरी शहरातील माळनाका येथे राज्यातील पहिल्या थ्रीडी तारांगणाचे भूमिपूजन करण्यात आले होते. सुमारे ९ कोटी रुपयांचा हा प्रकल्प तात्काळ हाती घेण्यात आला होता. सुवर्ण जयंती नगरोत्थान योजनेतून हा प्रकल्प उभा राहत आहे. सुमारे १२०० चौरस मी क्षेत्रावर ही वास्तू उभी राहणार असून चिमुकल्यांना तारे, ग्रहांच्या विश्वात घेवून जाणार आहे.
तारांगणाचे सिव्हिल वर्क पूर्ण झाले आहे. यातील आवश्यक यंत्रसामुग्री परदेशातून मागवण्यात येणार आहे. यासाठी स्वतंत्र निविदा काढण्यात येणार आहे. उच्च व तंत्रशिक्षणमंत्री ना. उदय सामंत यांनी रत्नागिरीत अशा पध्दतीचे तारांगण उभे राहावे यासाठी पुढाकार घेतला होता व त्यासाठी निधीही मिळवून दिला होता
www.konkantoday.com