
आज व उद्या बँक कर्मचाऱ्यांचा संप
कर्मचारी संघटनांच्या देशव्यापी संपामुळे सोमवारी आणि मंगळवारी देशभरातील बँकिंग सेवा प्रभावित होऊ शकतात. प्रस्तावित खासगीकरणाच्या निषेधार्थ नऊ संघटनांची संयुक्त संस्था युनायटेड फोरम ऑफ बँकिंग युनियनच्या निवेदनानुसार सुमारे दहा लाख कर्मचारी आणि बँकांचे अधिकारी संपात सहभागी होतील. अशा परिस्थितीत संपामुळे ठेवी आणि पैसे काढणे, चेक क्लिअरन्स आणि कर्ज स्वीकृती यासारख्या सेवांवर परिणाम होऊ शकतो. संपादरम्यान खासगी बँका आपले कामकाज सुरूच ठेवतील ही दिलासाची बाब आहे.
www.konkantoday.com