मुंबई विद्यापीठाने डिजिटलायझेशन आणि पायाभूत सुविधांचा विकास करण्यावर अर्थसंकल्पात भर दिला
करोना कालावधीतील अनुभवांतून शहाणे होत मुंबई विद्यापीठाने डिजिटलायझेशन आणि पायाभूत सुविधांचा विकास करण्यावर या अर्थसंकल्पात भर दिला आहे. विद्यापीठाचा २०२१-२२ चा ७२४ कोटी रुपये तरतुदींचा आणि ७८ कोटी ५३ लाख रुपयांच्या तुटीचा अर्थसंकल्प शनिवारी रात्री अधिसभे समोर सादर करण्यात आला
विद्यापीठाच्या अर्थसंकल्पात गेल्यावर्षीच्या तुलनेत यंदा घट झाली आहे. करोनामुळे यंदा विद्यापीठाचे उत्पन्न आणि तरतुदींमध्ये घट झाल्याचे विद्यापीठाने नमूद केले आहे.
यंदाच्या अर्थसंकल्पात १ कोटी रुपयांची तरतूद विद्यापीठाच्या डिजिटलायझेशनसाठी करण्यात आली आहे. याशिवाय विद्यापीठातील विकास कामे, विद्याथ्र्यांसाठी शिष्यवृत्तीची तरतूद करण्यात आली आहे.
विद्यापीठ उपकेंद्रातील पायाभूत सुविधा, अपंग विद्याथ्र्यांयोग्य परिसराची निर्मिती, शैक्षणिक सुविधा, स्व. बाळासाहेब ठाकरे कला आणि सांस्कृतिक केंद्र, विद्यापीठ परिसराचे सुशोभिकरण, सिंधुदुर्ग उपकेंद्र, इन्क्युबेशन सेंटर, डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय संशोधन केंद्र, शिक्षक आणि शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांसाठी निवासस्थान, क्रीडा संकुलाची स्थापना, सागरी संशोधन केंद्र, दुर्गम भागांतील अनुसूचित जमातीच्या विद्याथ्र्यांसाठी शिष्यवृत्ती, भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या ७५व्या सोहळ्याच्या नाविन्यपूर्ण उपक्रम, विद्यापीठ मुद्रणालयाचे सक्षमीकरण, मागासवर्गीय विद्याथ्र्यांना आर्थिक सहाय्य, ललित कला केंद्र, आंतरराष्ट्रीय अभ्यास केंद्र, राष्ट्रीय सेवा योजना, लोकमान्य टिळक अध्यासन केंद्र, अण्णा भाऊ साठे अध्यासन केंद्र, भाषाभ्यास केंद्र यासाठी विशेष तरतुद करण्यात आली आहे.
www.konkantoday.com