नक्षलवादग्रस्त गडचिरोली व मेळघाटातील वैद्यकीय शिक्षण घेऊ इच्छिणाऱ्या गरीब विद्यार्थ्यांसाठी ‘उलगुलान’
लोकबिरादरी प्रकल्प आणि लिस्ट फॉर अपलिफ्टमेंट या संस्थेने संयुक्तणे ‘उलगुलान’ हा वैद्यकीय प्रवेश परीक्षेची पूर्व तयारी करवून घेणाऱ्या प्रशिक्षण वर्गाची सुरूवात करण्याची घोषणा केलीय. डॉक्टर होण्याचे स्वप्न उराशी बाळगणाऱ्या व कठोर परिश्रमाची तयारी असलेल्या नक्षलवादग्रस्त गडचिरोली आणि मेळघाटातील आर्थिक दृष्ट्या मागास आणि अतिमागास विद्यार्थ्यांना याचा फायदा होणार आहे.
यात ३० विद्यार्थ्यांना मोफत प्रवेश दिला जाणार आहे. तसेच त्याची सर्वस्वी जबाबदारी संस्था स्विकारणार आहे.समीक्षा गोडसे आमटे यांच्या संकल्पनेतून ‘उलगुलान’ सुरू करण्यात आले आहे.
www.konkantoday.com