
दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांना परीक्षेची तयारी करणे सुकर व्हावे यासाठी प्रश्नसंच
वर्षभर ऑनलाइन वर्ग, परीक्षेच्या सरावाचा अभाव या पार्श्वभूमीवर दहावी आणि बारावीच्या परीक्षेचे स्वरूप बदलण्याची पालक आणि विद्यार्थ्यांची मागणी शिक्षण विभागाने अमान्य केली. मात्र, विद्यार्थ्यांना परीक्षेची तयारी करणे सुकर व्हावे यासाठी प्रश्नसंच देण्यात येणार आहेत.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने दहावी, बारावीच्या परीक्षा एप्रिलअखेरीस घेण्याचे नियोजन केले आहे. परीक्षेचे सविस्तर वेळापत्रकही जाहीर करण्यात आले. मात्र, आता राज्यात अनेक ठिकाणी करोनाचे रुग्ण वाढत असल्यामुळे परीक्षा ऑनलाइन घेण्याची मागणी पालक आणि विद्यार्थ्यांकडून सातत्याने करण्यात येत आहे.
www.konkantoday.com