रत्नागिरी तालुक्यातील रिळ गावामध्ये बिबट्याची दहशत
रत्नागिरी तालुक्यातील पावस गणेशगुळे येथील बिबट्याच्या कारवाया थंडावल्या असतानाच आता
रत्नागिरी तालुक्यातील रिळ गावामध्ये बिबट्याने धुमाकूळ घातला आहे. काही दिवसांपूर्वीच घरात घुसून गोठ्यातील गायीवर हल्ला करत बिबट्याने तिला ठार मारले. दररोज लोकांच्या पाळीव कुत्र्यांवरही बिबट्या हल्ले करत आहे. या सर्व घटनांमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. गावात बिबट्याची दहशत असून वनविभागाने तात्काळ बिबट्याला जेरबंद करावे अशी मागणी ग्रामस्थांमधून केली जात आहे.
www.konkantoday.com