राध्वी राकेश जाधव हिला क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल परमवीर सिंग, पोलीस आयुक्त, बृहन्मुंबई यांच्या हस्ते गौरविण्यात आले
दिनांक ८ मार्च , जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून मा. परमवीर सिंग, पोलीस आयुक्त, बृहन्मुंबई यांच्या हस्ते विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या पोलीस कुटुंबातील महिलांचा गौरव करण्यात आला .
त्यामध्ये संगमेश्वर तालुक्यातील खेळ व संस्कृती चा वारसा लाभलेले कोसुम्ब या गावातील रहिवासी श्री . शशिकांत बापूजी जाधव व सौ भारती शशिकांत जाधव यांची नात कु राध्वी राकेश जाधव वय १२ वर्षे हिस क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केल्याबाबत मा . पोलीस आयुक्त, बृहन्मुंबई यांच्या हस्ते सन्मानपत्र आणि पदक देऊन गौरविण्यात आले .
कु . राध्वी हिने बृहन्मुंबई जिल्हा जिम्नॅस्टिकस संघटना स्पर्धा 2019 -2020 मध्ये कांस्य पदक पटकावले होते. कु. राध्वी हिचे वडील श्री. राकेश जाधव हे मुंबई पोलीस दलात पोलीस उप निरीक्षक या महत्वाच्या पदावर कार्यरत आहेत . तसेच तिच्या यशात तीच्या आईचा सिंहाचा वाटा आहे.
कोसुम्ब गावाने आजपर्यंत कब्बडी ,कॅरम या खेळात अनेक राष्ट्रीय खेळाडू दिले आहेत. त्यातच कोसुम्ब ची कन्या कु राध्वी हिने देखील तोच वारसा कायम ठेवत जिम्नॅस्टिकस या वेगळया खेळ प्रकारात अगदी लहान वयात आपला ठसा उमटवला असल्याने तिचे सर्वत्र कौतुक होत आहे
www.konkantoday.com