सहकारी संस्थांच्या वार्षिक सभांना मुदतवाढ देणे अपरिहार्य ॲड. दीपक पटवर्धन

0
32

कोव्हीड-१९ च्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र सहकारी कायदा कलम ७५ आणि अनुषंगिक कलमांमध्ये बदल करून वार्षिक सर्वसाधारण सभा घेण्यासाठी ३१ मार्च २०२१ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली होती. कोव्हीड-१९चा प्रभाव वाढता असल्याने अनेक संस्थांच्या वार्षिक सभा अद्याप होऊ शकलेल्या नाहीत आणि सद्यस्थितीत ५० पेक्षा अधिक नागरिकांना एकत्र येण्यावर आणि बंधन असल्याने सभासदांना एकत्र करून सभा होऊ शकणाऱ्या नाहीत अशा स्थितीत ऑनलाइन सभांचा पर्याय नागरी बँका व गृहनिर्माण संस्थांसाठी मंजूर झाला. मात्र अन्य संस्थांचा उल्लेख शासनाच्या नव्याने आलेल्या परिपत्रकात नाही. त्यामुळे वार्षिक सभा ३१ मार्च २०२१ पूर्वी कशा घ्याव्यात ? याबाबत खूप गोंधळाचे वातावरण आहे. खरे पाहता शासनाने या वर्षीच्या ज्या संस्थांच्या वार्षिक सभा झालेल्या नाहीत त्या संस्थांसाठी वेगळा मार्ग घोषित करणे गरजेचे आहे. सन २०१९-२० ची वार्षिक सभा न झाल्याने अनेक तांत्रिक मुद्दे उपस्थित होणारे आहेत. एकतर निमंत्रित ३० सभासद प्रतिनिधींच्या उपस्थितीत वार्षिक सभा घेण्यास मंजुरी द्यावी, नाहीतर वार्षिक सभा देण्यास मुदतवाढ शासनाने देणे हा अपरिहार्य आहे. ऑनलाईन सभेचा मार्ग न परवडणारा तसेच तांत्रिक सुविधांच्या अभावाने ही अडचणीचे ठरत असल्याने ऑनलाइन सभा होऊ शकत नाहीत.
महाराष्ट्र सहकार कायद्यात आता मुदतवाढ मागण्याचा पर्याय संस्थांना उपलब्ध नाही. कायदा कानू मधील ती तरतूद रद्द करण्यात आली आहे. विहित मुदतीत सभा न झाल्यास ५०००/- दंड व अपात्रतेची तरतूद कायद्यात आहे. त्यामुळे या दोन दिवसात शासनाने न झालेल्या वार्षिक सभा बाबत काही ठोस निर्णय जाहीर करणे, त्याबाबत विधिमंडळात मंजुरी देणे ही पावले उचलण्याची मागणी आपण शासनाकडे करीत आहोत.
ज्या संस्थांचा सभा झालेल्या नाहीत त्यांनी प्रांत अधिकारी यांचेकडे सभा घेण्यासाठी लेखी परवानगी मागावी व त्यांचे येणारे उत्तर आपल्या दप्तरी ठेवावे व सहकार खात्याकडे मुदतवाढीसाठी प्रस्ताव सादर करावा. तसेच सहकार खात्याचे मार्गदर्शन लेखी स्वरूपात मागणी करण्यासाठी पत्र सहकार खात्याला सादर करावे.
कोव्हीड कालखंडाच्या पार्श्वभूमीवर वार्षिक सर्वसाधारण सभे संदर्भाने ठोस मार्गदर्शन अगर कायदा बदल करण्याची मागणी आपण महाराष्ट्र शासनाकडे करीत असल्याचे ॲड. दीपक पटवर्धन जिल्हा अध्यक्ष भा.ज.पा. यांनी सांगितले.
www.konkantoday.com

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here