आंगणेवाडी येथील भराडी देवीची यात्र‍ा कुटुंबापुरती , कोराेनाच्या पाश्र्वभूमीवर भाविकानी जाऊ नये- पालकमंत्री उदय सामंत यांचे आवाहन

0
37

लाखो भाविकांचे श्रद्धास्थान म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मालवण तालुक्यातील आंगणेवाडी येथील भराडी देवीची यात्रा ६ मार्च रोजी होणार आहे. कोरोना पार्श्वभूमीवर यावर्षी केवळ आंगणे कुटुंबीय मर्यादित यात्रा होणार आहे. आंगणे कुटुंबातील ५०-५० व्यक्तींना मंदिरात प्रवेश दिला जाणार आहे. अन्य भाविकांना यात्रेत अथवा मंदिरात प्रवेश दिला जाणार नाही. अन्य भाविकांसाठी आंगणेवाडीत येणारे मालवण, कणकवली, मसुरे हे मार्ग पोलीस प्रशासनाच्या वतीने सील केले आहेत. त्यामुळे या वेळच्या करोनाचा परिस्थितीचा विचार करून भाविकांनी भराडी देवीच्या यात्रेला जाणे टाळावे असे आवाहन सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांनी केले आहे
www.konkantoday.com

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here