शिरोडा वेळागर येथील ताज ग्रुपच्या भूसंपादनाला शिरोडा वेळागर भूमिपुत्र संघाचा विराेध
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शिरोडा वेळागर येथील जमीन महाराष्ट्र शासनाने पर्यटन प्रकल्पासाठी संपादित केली आहे.संपादन केलेली जमीन रद्द करून ती शेतकर्यांना परत मिळावी, अशी गेल्या कित्येक वर्षांपासूनची शेतकर्यांची मागणी आहे यासंदर्भात न्यायालयीन लढाई सुद्धा सुरू आहे. शिरोडा-वेळागर येथील सर्वे नंबर २९मधील जमिनीवर पंचतारांकित हॉटेल होणार म्हणून ताज ग्रुपसाठी सदर जमीन संपादीत केली होती.तेव्हापासून भूमिपुत्र याला विरोध करत आहेत.भूमिपुत्रांचा पर्यटनाला विरोध नसून सदर जमिनीचा योग्य मोबदला द्यावा किंवा आमच्या जमिनी आम्हाला परत द्याव्यात,अशी मागणी भूमिपुत्रांची आहे.मात्र अद्यापही मोबदला मिळत नसल्याने ‘शिरोडा वेळागर भूमिपुत्र संघ शिरोडा’ या नावाने संघटना स्थापन करण्यात आलेली आहे.
www.konkantoday.com