मुकुल माधव फाउंडेशन कडून शाळांच्या स्वच्छतागृहांची उभारणी
मुकुल माधव फाउंडेशन व फिनोलेक्स इंडस्ट्रीज लिमिटेड हे आरोग्य, शिक्षण, सामाजिक विकास, पर्यावरण, व स्वच्छता या क्षेत्रात भरीव काम करत आहेत. रत्नागिरी परिसरातील शाळांमध्ये दरवर्षी विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी करण्याबरोबरच शाळांच्या शैक्षणिक गरजा लक्षात घेऊन त्या गरजांची पूर्तता करण्यात येते. याचाच एक भाग म्हणून केंद्र शासनाच्या स्वच्छ भारत अभियानामध्ये सहभागी होऊन मुकुल माधव फाउंडेशन व फिनोलेक्स इंडस्ट्रीज लिमिटेड यांनी शाळांमध्ये स्वच्छतागृह बांधण्याचे काम हाती घेतले आहे. यापूर्वी रत्नागिरीतील पावस विद्यामंदिर, नेवरे हायस्कूल, कोतवडे हायस्कूल, सरस्वती विद्यामंदिर गावखडी, महालक्ष्मी विद्या मंदिर खेडशी, मराठा मंदिर पाली, जि. प. गोळप . शाळा अशी ८ स्वच्छतागृहं बांधण्यात आली आहेत. तसेच आता नाणीज पंचक्रोशी शिक्षण मंडळ, नाणिज व माध्यमिक विदयालय धामणसे येथे स्वच्छतागृहांची उभारणी करण्यात आली आहे. याचे उद्घाटन दिनांक २ मार्च रोजी करण्यात आले. त्याप्रसंगी उद्योजक रवीद्र सामंत, जि. प. सदस्य. पंचायत समिती सदस्य, शाळेचे मुख्याध्यापक, संस्थेचे पदाधिकारी, इतर कर्मचारी, मुकुल माधव फाउंडेशन व फिनोलेक्स इंडस्ट्रीज लिमिटेडचे पदाधिकारी उपस्थित होते.
शाळेच्या मुख्याध्यापक व संस्थlचालक यांनी मुकुल माधव फाउंडेशनच्या व्यवस्थापकीय विश्वस्थ सौ. रितू प्रकाश छाब्रिया यांचे त्यांनी दिलेल्या स्वच्छतागृहाच्या उभारणीसाठी आभार मानले. तसेच या माध्यमातून गावांमध्ये स्वच्छता संदेश पोचवण्यासाठी केलेल्या योजना बद्दल आभार मानले
www.konkantoday.com