कोरोना विषाणू सत्ताधारी आणि विरोधी पक्ष ओळखत नाही -मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

0
35

मी जबाबदार ही मोहीम हे उघड ते उघडा त्यांच्यासाठी आहे. मला वाईट म्हटलं तरी चालेल मी वाईटपणा घेईन. माझी थट्टा करा, जनतेच्या जीवाशी खेळ करु नका. पण एका वर्गासाठी समाज धोक्यात घातला तर तुरुंगात टाकल्याशिवाय राहणार नाही. कोरोना विषाणू सत्ताधारी आणि विरोधी पक्ष ओळखत नाही,” अशा शब्दात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भाजपला प्रत्युत्तर दिलं. विधानसभेत राज्यपालांच्या अभिभाषणाच्या अभिनंदन प्रस्तावावर चर्चेदरम्यान विरोधकांनी मी जबाबदार मोहिमेवरुन सरकारवर तसंच मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधला होता.
www.konkantoday.com

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here