कोकणातील बागायतदारांचे प्रश्न बाबत शरद पवारांनी बोलावली शुक्रवारी बैठक, आमदार शेखर निकम यांचा पुढाकार

0
29

चिपळूण- संगमेश्वर विधानसभा मतदार संघाचे आमदार शेखर निकम यांनी काल बुधवारी सकाळी मुंबई येथे माजी मंत्री खासदार शरद पवार यांची भेट घेतली. त्या वेळी त्यांनी कोकणातील आंबा, काजू, फणस आदी बागायतदारांचे प्रश्न मांडले. त्यावर शेखर निकम यांनी आंबा, काजू, फणस बागायतदारांसोबत त्यांच्या अडीअडचणी समजून घेणे व त्यातून मार्ग काढण्यासाठी मुंबईत यशवंतराव चव्हाण सेंटर येथे शुक्रवारी दि. ५ मार्च रोजी सकाळी साडेनऊ वाजता बैठक आयोजित केली आहे. या बैठकीला आमदार शेखर निकम व कोकणातील बागायतदार, संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित राहणार आहेत.
www.konkantoday.com

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here