
विधानसभा तालिका अध्यक्षपदी आ. राजन साळवी
राजापूर-लांजा -साखरपा विधानसभा आमदार राजन साळवी यांची विधानसभेच्या तालिका अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. विधिमंडळाचे मुंबई येथे सुरू असलेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात ही निवड करण्यात आली.
विधानसभा अध्यक्षांच्या अनुपस्थितीत तालिका अध्यक्ष अधिवेशनाचे कामकाज सांभाळतात. आमदार राजन साळवी यांची तालिका अध्यक्षपदी नियुक्ती झाली असल्याने अधिवेशनामध्ये आमदार साळवी विधानसभेचे कामकाज सांभाळणार आहेत. त्यांचा प्रशासकीय अनुभव आणि विधिमंडातील गत अकरा वर्षांची अभ्यासू कारकिर्द याची दखल घेत त्यांची विधानसभेच्या सर्वोच्च स्थानी निवड होवून सभागृहाचे कामकाज चालविण्याची जबाबदारी त्यांना देण्यात आली आहे.
www.konkantoday.com