खोटे दस्तऐवज करून ३ लाख ६४ हजार रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी पणदेरी मंडणगड येथील तीन जणांविरूद्ध गुन्हा दाखल

0
33

मंडणगड तालुक्यातील पणदेरी येथील जिल्हा परिषद शाळेचे बनावट दस्तऐवज करून ३ लाख ६४ हजार रुपयांचे चेक आपल्या खात्यात जमा करून फसवणूक केल्याप्रकरणी महमद तहवीलदार, फरीदा तहवीलदार व अब्दुल मुरूडकर या तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यातील आरोपींनी संगनमताने शाळेचे जुने खाते बंद करून नवीन खाते काढले. व त्यामध्ये दोन चेकची मिळून ३ लाख ६४ हजार रुपयांची रक्कम आपल्या खात्यात जमा करून घेतली. शाळेचा जिल्हा परिषदेचा जमातीचा व फिर्यादीच्या जमातीचा सदस्य असल्याचा खोटा दस्तऐवज त्यांनी तयार केला व विश्‍वास संपादन करुन बनावट दस्तऐवजाआधारे ही रक्कम स्वतःच्या फायद्यासाठी वापरून फसवणूक केली.
www.konkantoday.com

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here