रत्नागिरी शहराच्या प्रवेशद्वारापासून शहरातील महत्त्वाच्या चौकांचे पर्यटनदृष्ट्या सुशोभिकरण करण्यात येणार

0
35

रत्नागिरी शहराच्या प्रवेशद्वारापासून शहरातील महत्त्वाच्या चौकांचे पर्यटनदृष्ट्या सुशोभिकरण करण्यात येणार आहे
जे.जे.स्कूल ऑफ आर्टच्या पथकाने यासर्व ठिकाणांची पहाणी केली. या सुशोभीकरणातून रत्नागिरी शहराला पर्यटनाचा एक साज चढेल, असा विश्वास उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केला.
जे.जे.स्कूल ऑफ आर्टचे पथकाने शहरातील साळवी स्टॉप येथील कमान,मारूती मंदिर येथील सर्कल, माळनाका येथील लोकनेते शामराव पेजे यांचा पुतळा,जिल्हा रूग्णालया समोरील भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा, सावरकर चौक, मांडवी ही महत्वाची ठिकाणे सुशोभित करणार आहे.मारूती मंदिर येथील सुशोभिकरणासाठी १ कोटी रूपये मंज़ूर झाले आहे.साळवी स्टॉप येथील कमानीसाठी ३० ते ३५ लाख रूपयांचा निधी रत्नागिरी नगर परिषद देणार आहे. ही सर्व कामे पुढील दीड महिन्यात सुरू होतील असा विश्वास सामंत यांनी व्यक्त केला.जे.जे.स्कूल आर्टचे जसे मुंबईत संग्रहालय आहे तसेच संग्रहालय थिबा राजवाड्यात उभे केले जाणार आहे मांडवी किनारा ते भाट्ये किनारा पर्यंत आगळ्या वेगळ्या पध्दतीने सुशोभिकरण केले जाणार आहे
www.konkantoday.com

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here