रत्नागिरी शहरवासीयांचे चांगल्या रस्त्याचे स्वप्न पावसापर्यंत लांबणीवरपडणार असल्याचे चिन्हे दिसत आहेत
रत्नागिरी शहरात नळपाणी योजनेचे काम सुरू आहे. काही भागात पाईपलाईन टाकण्याचे काम पूर्ण झाले असून एकदा पाणी पुरवठ्याची चाचणी केल्यानंतर ते रस्ते पुन्हा व्यवस्थित केले जातील. रत्नागिरी शहरातील सर्व रस्ते पावसाळ्यापूर्वी पूर्ववत करू, असे आश्वासन नगराध्यक्ष प्रदीप साळवी यांनी दिले.शहरातील पाणी योजना आम्ही लवकरच पूर्ण करून त्यांच्या उद्घाटनाला आमच्यावर टीका करणाऱ्या विरोधकांना बोलवू असा टोलाही नगराध्यक्ष साळवी यांनी हाणला. ते म्हणाले की, विरोधकांना सध्या काम नाही त्यामुळे ते आमच्यावर आरोप करत सुटले आहेत.
www.konkantoday.com
Home स्थानिक बातम्या रत्नागिरी शहरवासीयांचे चांगल्या रस्त्याचे स्वप्न लांबणीवर, शहरातील सर्व रस्ते पावसाळ्यापूर्वी पूर्ववतकरण्याचे नगराध्यक्षांचे...